spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आजनगांव येथे आज ‘तूच माझी सौभाग्यवती’ नाटकाचे मोफत सादरीकरण 

किशोर साहू, मौदा :- मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर उद्या मंगळवार (ता.10 मार्च)ला सायं. हनुमान मंदिर परिसर आजनगांव च्या भव्य आवारात (बंद शामियानात) गावकरी नाट्यकला मंडळ तर्फे धनंजय स्मृती रंगभूमी वडसा प्रस्तुत ‘तूच माझी सौभाग्यवती’या नाटकाचे मोफत सादरीकरण करण्यात येणार आहे.

उद्घाटक नगरपंचायत मौदाचे नगराध्यक्ष राजा तिडके, सह उद्घाटक माजी जि प सदस्य देवेंद्र गोडबोले, अध्यक्ष सरपंच गट ग्रामपंचायत आजनगांव चिंतामण सारवे, प्रमुख पाहुणे उपसरपंच प्रफुल मेहर, माजी उपसरपंच काशीराम मते, माजी सरपंच निशा पोटफोडे, पोलीस पाटील शिल्पा ढोणे, तंटामुक्त अध्यक्ष धर्मराज मेश्राम सह समस्त सदस्यगण सह गावातील,परिसरातील, तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तरी या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आव्हान आयोजक सर्व आजी-माजी सदस्यगण व गावकरी मंडळी आजनगांव यांनी केले आहे.

Popular Articles