किशोर साहू, मौदा :- जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री ॲड जयस्वाल यांनी आपली उपस्थिती दर्शविली व गावातील माता-भगिनींशी संवाद साधत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. स्त्री शक्तीच्या सामर्थ्याला वंदन करत समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
यावेळी गावातील अंगणवाडी सेविका जांभूळकर यांचा सेवानिवृत्ती करिता व बावनकुळे यांचा सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावत असल्यामुळे या दोघांचेही शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करून अभिनंदन केले.

आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रकारचे महिलांचे खेळ या ठिकाणी घेण्यात आले त्या सर्व विजेत्यांचे बक्षीस देऊन त्यांचे सुद्धा अभिनंदन जयस्वाल हस्ते करण्यात आले.
अतिशय छान नियोजन गावातील महिला मंडळींनी या ठिकाणी केलेले होते.
याप्रसंगी अरोली गावच्या सरपंच रोशनी प्रशांत भुरे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे, भाजपा कोदामेंढी जि प सर्कल क्लस्टर प्रमुख भगवान बावनकुळे , सविता निमकर, डॉ. महल्ले, शाळेतील शिक्षिका व गावातील असंख्य महिला यावेळेस उपस्थित होत्या.








