spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नखरा नथीचा : सुमधूर गीतांनी रंगला महिला दिनाचा कराओके सोहळा

नागपूर :- जागतिक महिला दिनाच्या औचित्याने संगीत रागिणी कराओके म्युझिकल ग्रुप आणि कल्चरल इव्हेंट तर्फे साकार स्टुडिओ येथे “नखरा नथीचा” हा सुमधुर गीतांचा बहारदार कराओके म्युझिकल कार्यक्रम उत्साहात पार पडला. संगीत, उत्साह आणि महिलांच्या सहभागाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण नामांकित गायक मुरली खिलराणी ठरले. त्यांनी सादर केलेल्या “राधा ही बावरी” या गीताने प्रेक्षकांची मने जिंकत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

कार्यक्रमाचे संचालन संगीत रागिणी कराओके म्युझिकल ग्रुपच्या डायरेक्टर रोशनी सावरकर यांनी केले. त्यांनीही आपल्या सुरेल आवाजात “पिया बावरी” हे क्लासिकल गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाची सुरुवात अरुण मुळे यांनी “तू कितनी अच्छी है” या गीताने केली. यानंतर ग्रुपमधील महिला गायकांनी विविध हिंदी आणि मराठी गीते सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली.

या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रुपतर्फे सर्व महिलांना रोशनी सावरकर यांच्या हस्ते नाकातील नथ स्नेहभेट म्हणून देण्यात आली, ही कार्यक्रमाची विशेष आकर्षक बाब ठरली. कार्यक्रमात नीता खाडे, नीता मुळे, रश्मी गदरिये, कादंबरी राऊत, कामिनी निमजे, बबिता बांते, शारदा सोमकुवर, ललिता धामणकर, नीता सेलूकर आणि छाया मलमकर या महिला गायकांनी आपल्या सुमधुर गीतांनी कार्यक्रम सजविला.

या महिला गायकांना साथ देण्यासाठी अमोल लाभसेटवार, अरुण मुळे, सुरेश शास्त्रकार, सुनील राऊत, संतोष भोपळे, रामेश्वर गदरीये आणि रवींद्र जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.

संगीत, उत्साह आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात आनंदाच्या आठवणी निर्माण करून गेला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.