spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हलबांच्या मागण्या पूर्ण करा – प्रवीण दटके

नागपूर :- हलबांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना प्रवीण दटके सभागृहात म्हणाले की, हलबा हलबी जमातीच्या प्रमुख मागण्यास संबंधात शासनासोबत अनेकदा चर्चा झाली परंतु अद्यापही हलबा हलबी जमातीच्या मागण्या प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांकरिता विधिमंडळ अधिवेशनादरम्यान हलबा समाजाचे डॉ.सुशील कोहाड आणि जगदीश खापेकर हे गांधीबाग येथे उपोषण आंदोलन करीत आहेत असे दटके यांनी सरकारला औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाला निदर्शनास आणून दिले.

घटना यादी मध्ये महाराष्ट्र अनुसूचित जमाती अधिसूची मधील क्रमांक 19 मध्ये 19 halba ,hulbi insert halba, halbi of erstwhile C.P & berar whose record show as koshti because of vocation of weaving अशी घटना दुरुस्ती होणे आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी तसेच हलबास जमातीसाठी श्री संत कोलबा स्वामी हलवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली. याविषयात निर्णय न झाल्यास विधान भवनात आंदोलन करण्याची भावना प्रवीण दटके यांनी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.