Home Latest News सुदृढ समाज निर्मितीसाठी लैंगिक समानता आवश्यक

सुदृढ समाज निर्मितीसाठी लैंगिक समानता आवश्यक

0

<p><strong>नागपूर कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश मीराताई खड्डक्कार यांचे प्रतिपादन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>विद्यापीठात महिला सुरक्षा आणि लैंगिक समानता विषयावर जनजागृती कार्यक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १० &colon;  <&sol;strong>सुदृढ समाज निर्मितीसाठी लैंगिक समानता आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूर कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश  मीराताई खड्डक्कार यांनी केले&period; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात &&num;8216&semi;सुरक्षा आणि सक्षमीकरण &colon; महिला सुरक्षा आणि लैंगिक समानता&&num;8217&semi; या विषयावर अंबाझरी रोडवरील गुरुनानक भवन येथे मंगळवार&comma; दि&period; ९ सप्टेंबर २०२५ रोजी जनजागृती कार्यक्रम पार पडला&period; विद्यापीठ कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समिती&comma; राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून खड्डक्कार मार्गदर्शन करीत होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar; यांनी भूषविले&period; प्रमुख अतिथी म्हणून नागपूर कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश  मीराताई खड्डक्कार&comma; अतिथी वक्ता म्हणून स्त्री रोगतज्ञ डॉ&period; नीता सप्रे&comma; विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ&period; सुभाष कोंडावार&comma; सामाजिक कार्यकर्ता  माधुरी साकुलकर&comma; राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ&period; सोपानदेव पिसे&comma; विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ&period; विजय खंडाळ&comma; कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्षा डॉ&period; शालिनी लिहितकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती&period; समाजामध्ये महिला सुरक्षित तसेच सक्षम असणे आवश्यक असल्याचे  खड्डक्कार यांनी पुढे बोलताना सांगितले&period; भारतातील महिला जगातील महिलांच्या तुलनेत भाग्यवान आहेत&period; भारतात संविधान लागू झाले तेव्हाच महिलांना समानता मिळाली&period; जगातील इतर देशात मात्र मतदानाचा अर्थात समानतेचा अधिकार मिळविण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागला&comma; असे  खड्डक्कार म्हणाल्या&period; वास्तवात परिस्थिती तशीच असून महिलांना समाजामध्ये दुय्यम स्थान दिल्या जाते&period; समाजात समानता मानली जात नाही&period; पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना काही गोष्टींचा सामना करावा लागतो&period; महिलेसाठी सर्वाधिक सुरक्षित घर मानले जाते&comma; असे असताना देखील महिलांच्या सुरक्षेसाठी कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा करावा लागला आहे&period; समाजात महिलांवर अनेक अत्याचार होताना दिसत असून अनेक प्रकरणे समोर येत असल्याने फौजदारी कायद्यात अनेक सुधारण्या करण्यात आल्या&period;<br &sol;>&NewLine;त्याचप्रमाणे महिला घराबाहेर येत सक्षम सबल व्हावी सुरक्षित असावी म्हणून कायदा करावा लागला&period; सक्षमीकरण म्हणजे अर्थार्जन करणे नव्हे तर गुणांना वाव मिळून महिला व पुरुष समान मानणारे व्यक्तिमत्व घडावे&comma; असे त्यांनी सांगितले&period; मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग अर्थार्जन करण्यास झाला&period; ज्ञानाचा उपयोग समाजसेवा&comma; देशसेवा करण्यासाठी आवश्यक आहे&period; संविधानाने अधिकार दिला&period; कायदे झाले नोकरीच्या ठिकाणी अधिकार मिळाले&period; एक पंख जर कमजोर असेल तर त्याला बळकट करण्यासाठी तजवीज करावी लागते महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे&period; कर्तव्याच्या ठिकाणी कार्य करीत असताना येणाऱ्या अडचणी राजस्थान येथील एका प्रकरणाची माहिती देत असताना १९९२ मध्ये अस्तित्वात आलेल्या कायद्याची माहिती त्यांनी यावेळी त्यांच्या भाषणातून दिली&period; कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी लैंगिक समानता निर्माण करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन  खड्डक्कार यांनी यावेळी केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>आचरणातून येणार समानता &colon; कुलगुरू<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>स्वतःपासून बदल करीत महिला व पुरुष असा भेद न करता कौशल्य कोणतेही कार्य मानून करणे आवश्यक आहे&period; आपल्या आचरणातूनच लैंगिक समानता निर्माण होईल&comma; असे प्रतिपादन माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे यांनी केले&period; संपूर्ण जगात महिलांची लोकसंख्या अर्धी असताना घर&comma; कार्यालयात सुरक्षित नसल्याने महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी विविध कायद्यांची निर्मिती करण्यात आली&period; पुढचे भविष्य चांगले ठेवायचे असेल तर महिला सुरक्षित असणे गरजेचे आहे&period; महिलांना शारीरिक&comma; भावनिक&comma; मानसिक&comma; आर्थिक&comma; राजकीय असे सर्वांगीण सुरक्षा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले&period; असमानतेचा भेद गर्भातूनच सुरू होत असल्याने प्रत्येक व्यक्तीने लैंगिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज कुलगुरूंनी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सर्वांच्या प्रगतीला संधी देणारा समाज घडावा &colon;  साकुलकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>सर्वांच्या प्रगतीला संधी देणारा समाज घडावा&comma; असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता  माधुरी साकुलकर यांनी केले&period; महिला सुरक्षा हा चिंतेचा विषय असून लैंगिक समानता आल्यास अशा प्रकारचे जागृती करणारे कार्यक्रम घेण्याची वेळ येणार नाही&period; लिंगभेद हा सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या घडविला जातो&period; समाज संस्कृती आणि पालन यातून लैंगिक असमानता निर्माण पुण्यात सुरुवात होते&period; मात्र&comma; परिस्थिती बदलते आहे&period; या दृष्टीने आणखी तपासून पाहण्याची गरज आहे&period; जगाच्या तुलनेत यात आपण खूप मागे असून समानता आणण्याकरिता १५० वर्ष यायला लागेल असे साकुलकर म्हणाल्या&period; नैसर्गिक सामाजिक लैंगिक समानता लिंगभेद आदी विषयावर त्यांनी विस्तृत माहिती दिली&period; पूर्वीच्या काळातील उदाहरणे देत महिला आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक फरक देखील त्यांनी समजावून सांगितला&period; या नैसर्गिक फरकाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती केल्यास लैंगिक समानता निर्माण करता येईल&comma; असे देखील त्या म्हणाल्या&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>महिलांचे आरोग्य व सुरक्षा हा सामाजिक प्रश्न &colon; डॉ&period; नीता सप्रे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>महिलांचे आरोग्य&comma; सुरक्षा व लिंगभेद समानता हा सामाजिक प्रश्न असल्याचे प्रतिपादन नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ&period; अनिता सप्रे यांनी केले&period; पीपीटी च्या माध्यमातून डॉक्टर सप्रे यांनी महिला सुरक्षा त्यांचे आरोग्य आणि लैंगिक समानता याविषयी विस्तृत माहिती दिली&period; स्त्रीरोग तज्ञ म्हणून महिलांच्या सर्व समस्या जवळून बघितल्या असल्याचे त्यांनी सांगितले&period; महिलांचे आरोग्य&comma; शारीरिक संबंध&comma; गर्भधारणा&comma; मुलांचे जन्म कौटुंबिक हिंसा&comma; मानसिक आरोग्य याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यापीठाच्या कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्षा डॉ&period; शालिनी लिहितकर यांनी कार्यक्रमाबाबत विस्तृत माहिती दिली&period; कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षा बाबत जागृती व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; संपूर्ण शैक्षणिक परिसर लिंगभेद विरहित व्हावा यासाठी समिती सतत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले&period; विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षात प्रथमच जेंडर ऑडिट करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली&period; कार्यक्रमाचे संचालन डॉ&period; प्रीती उमरेडकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ&period; सोपानदेव पिसे यांनी मानले&period; यानंतर मयुरी पुरणकर यांनी महिलांचा बुद्ध्यांक महिला सुरक्षा व महिला सक्षमीकरणाबाबत विशेष व्याख्यान दिले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version