spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ताडोबाला जाताय…! सफारीच्या या बदललेल्या वेळा एकदा बघाच

नागपूर :- उन्हाळा आणि चंद्रपूर हे समीकरण कुणाला सांगण्याची गरज नाही. या जिल्ह्यातील तापमानाचा पारा एकदा वाढायला लागला की त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होतो. मग तो जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प का असेना. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाला सफारीच्या वेळादेखील बदलाव्या लागतात.

फेब्रुवारीत बदललेल्या वेळा

फेब्रुवारी सुरू होताच राज्यात वाढत्या उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात दुपारच्या सफारीच्या वेळा बदलण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला. १३ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंतदुपारची सफारीची वेळ नेहमीप्रमाणे २ ते ६ अशी न राहता ती दुपारी २:३० ते ६:३० अशी करण्यात आली. १३ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान पूर्ण वेळ सफारीची वेळ सकाळी ६:१५ ते सायंकाळी ६:१५ अशी करण्यात आली. सकाळच्या सफारीची वेळ सकाळी ६:३० ते सकाळी १०:३० आणि दुपारच्या सफारीची वेळ दुपारी २:३० ते सायंकाळी ६:३० अशी करण्यात आली.

उन्हाचा चटका वाढताच एप्रिलमध्ये बदल

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पूर्णवेळ सफारी आता सकाळी ५.४५ ते सायंकाळी ७.१५ वाजेपर्यंत अशी असणार आहे. सकाळची सफारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत असणार आहे. दुपारची सफारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे यंदा दोन महिन्यांच्या कालावधीतच दोन वेळा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सफारीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

सफारीच्या वेळात बदल का

दरवर्षी १ मे पासून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सफारीच्या वेळात बदल केला जातो. मात्र, यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढणार अशी चिन्हे आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात जशी किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट आली होती, तशीच यावेळी उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने आधीच सफारीच्या वेळांमध्ये बदल केला आहे.

Popular Articles