Related Posts

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र सदनाचे निवास आयुक्त &lpar; गुंतवणूक&rpar; सुशील गायकवाड यांची आज भारत सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन &lpar;ICEA&rpar; चे कार्यकारी संचालक व मुख्य सल्लागार राजेश शर्मा यांनी महाराष्ट्र सदनात भेट घेतली&period; या बैठकीत महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स&comma; सेल्युलर तसेच सेमीकंडक्टर उद्योगांच्या विस्तारासाठी संभाव्य सहकार्य&comma; गुंतवणूक संधी आणि धोरणात्मक बाबींवर सविस्तर चर्चा झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत राजेश शर्मा यांनी ICEA च्याभारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील प्रगती आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली&period; तसेच महाराष्ट्रात सेमीकंडक्टर आणि मोबाइल उत्पादन क्लस्टर विकसित करण्यासाठी राज्य सरकारबरोबर भागीदारीच्या शक्यतेवर भर दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>सुशील गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या नव्या गुंतवणूक धोरणाची वैशिष्ट्ये&comma; उद्योगपूरक वातावरण आणि केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांची माहिती दिली&period; महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे&period; ICEA सारख्या नामवंत संस्थांसोबत काम करण्यास शासन उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र हे इलेक्ट्रॉनिक्स व सेल्युलर उद्योगांचे देशातील प्रमुख केंद्र आहे&period; ICEA आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील हे सहकार्य या क्षेत्राच्या जलद वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल असा विश्वास राजेश शर्मा यांनी भेटीनंतर व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;