– आमदार डॉ आशिषराव देशमुख यांची भूमिकेवर सर्वांचे लक्ष
सावनेर :- भारतीय संस्कृतीत प्रराक्रमाचे प्रतिकपर्व असलेल्या विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाला भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी, महाराष्ट्रच्या वतीने आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात २ ऑक्टोबर गुरुवारला सायंकाळी ५.३० च्या सुमारास नगर परिषद ग्राउंड, सावनेर येथे भव्य दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील घडामोडी, नागपूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा, सावनेर नवनिर्माण, सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचा विकास अशा अनेक विषयांवर आमदार डॉ आशिषराव देशमुख आपले प्रखर विचार मांडणार आहेत विकासाचे राजकारण केल्यास सर्व समाजाचे भले कसे होईल यावर आमदार डॉ देशमुख रोखठोक भूमिका स्पष्ट करणार आहेत.
सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने डॉ आशिष देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे आतापर्यंत आमदार डॉ देशमुखांची कामगिरी दमदार असल्याची पावती जनतेनी दिली आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांनी विकासाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे, आमदार डॉ आशिष देशमुख याप्रसंगी काय भूमिका, विचार मांडतील यावर सर्वांचं लक्ष लागले आहे.
कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीव पोतदार, काटोल विभाग जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, काटोल विभाग भाजयूमो जिल्हा अध्यक्ष पियुष बूरडे, जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, सावनेर शहर मंडळ अध्यक्ष मंदार मंगळे, सावनेर शहर मंत्री तेजस्विनी लाड, सावनेर शहर महामंत्री रितेश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
यावेळी भव्य दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




