– 9 ऑक्टोंबर ला अल्पमुदतीच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन
नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अल्पमुदतीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत व कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे माननीय मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून गुरुवार दिनांक 9 ऑक्टोंबर 2025 ला अल्पमुदतीच्या प्रशिक्षणाची उद्घाटन होणार आहे.
राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अल्पमुदतीची अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील युवक व युवतीं करिता ही एक चांगली संधी कौशल्य रोजगार व उद्योजकता व नावीन्यता विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे या खात्याची मंत्री मंगल प्रभात लोढा यांची ही संकल्पना असून या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून युवकांना व युवतींना रोजगाराची व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी त्यांच्या हाताला काम मिळावे व ते सक्षम व्हावे व रोजगार व स्वयंरोजगार करता यावा याकरिता अल्पमुद्दीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहे.नागपूर विभागातील एकूण 17 औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये संस्थांमध्येव दहा टेक्निकल हायस्कूल यामध्ये विविध अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, ड्रोन टेक्निशियन, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, मोबाईल रिपेरिंग टेक्निशियन वेल्डर फॅब्रिकेटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स,ड्रोन टेक्निशियन वेब डेव्हलपर, सीएनसी मिलिंग अँड लेथ ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असे नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाची निवड करण्यात आलेली आहे. आजच्या पिढीला नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेता यावे आणि त्या माध्यमातून त्यांचे कौशल्य विकसित व्हावे व त्यांना रोजगाराची व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी हा उद्देश आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची व स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होईल ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली असून विद्यार्थी त्याच्या आवडीचा अभ्यासक्रमाची निवड करू शकतात त्यांना ज्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्या आयटीआय भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रमोद ठाकरे असे आव्हान करत आहे की नागपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाकरिता ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावीत तसेच शासकीय आयटीया, तंत्र माध्यमिक शाळेमध्ये युवक युवतींनी प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी करून कौशल्य विकसित करावे नागपूर जिल्ह्यातील युवकांना व युतींना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगाराची व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी त्यांच्या हाताला काम मिळावे व त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी एक कौशल्य आधारित प्रशिक्षण पूर्ण व्हावे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर मुलींची प्राचार्य दिगंबर पुंड यांनी महिलांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवीन तंत्रज्ञानावर अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले असून त्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी व युवतींनी प्रवेशाकरिता नोंदणी करावी असे आव्हान केले नोंदणी करण्याकरिता खालील वेबसाईट व लिंक दिलेली आहे यावर मोठ्या संख्येने युवक युवतींनी नोंदणी करावी तसेच रजिस्ट्रेशन करिता किंवा QR CODE सुद्धा देण्यात येत आहे. http://msbsvet.edu.in/registration /candidate registration.aspx?p1=91
तसेच
iti.admission.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थीना नोंदणी करायची आहे. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण चे अधिकारी प्रमोद ठाकरे सोबत दिगांबर पुंड , सहदेव चव्हाण, विजय कोटकर, राहुल शिदोंलिया निल तामडे संजय निहारे यांची उपस्थिती होती.








