spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा नगरीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

खापा, वार्ताहर :- हिंदू जागरणाला नवी ऊर्जा व चेतना देण्यासाठी तसेच सनातन धर्म आणि सामाजिक एकतेचा संदेश दृढ करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्यावतीने खापा शहरात शुक्रवार २० मार्च रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत बाजार चौक येथील बँक ऑफ बडोदा समोरील प्रागंणात भव्य हिंदू सम्मेलन पार पडणार आहे. खापा येथे प्रचारक अटल पांडे (वर्धा) मुख्य वक्ता म्हणुन मार्गदर्शन करणार आहे.

यानिमीत्ताने दुपारी ४ वाजता दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे. ही दिंडी यात्रा संत पतीराम महाराज वाडी ते कार्यक्रम स्थळ तसेच गुमगाव माईन ते कार्यक्रम स्थळ अशी पथसंचलन करीत कार्यक्रम स्थळ बँक ऑफ बडोदा समोरील प्रागंणात पोहचेल.

खापा मंडळ मध्ये येणाऱ्या तिघई, वाकोडी, खेडी, कोदेगाव, नंदापुर, करजघाट, गुमगाव, शेरडी, डोहनघाट, अजनी, दुधबर्डी, बावनगाव गावातील नागरिकांनी सहपरिवार मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Popular Articles