spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सोनबर्डी येथे भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन

पांढरकवडा :- तालुक्यातील सोनबर्डी येथे रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ (रजि. १००२९), रामनवमी उत्सव समिती आणि समस्त सोनबर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘भव्यदिव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. हा सोहळा शनिवार, २१ मार्च आणि रविवार, २२ मार्च २०२६ रोजी हनुमान मंदिर परिसर, सोनबर्डी येथे पार पडणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारी ही खंजेरी भजन स्पर्धा राज्यस्तरीय असून, यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामांकित भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा मेळ या स्पर्धेच्या माध्यमातून साधला जाणार आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळातील सर्व स्पर्धकांनी आणि भजनी मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली कला सादर करावी, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे: चिराग निपुगे: ९७६७१४९१४६, संदेश मादाडे: ८०८०२७७४१४

स्थळ: हनुमान मंदिर, सोनबर्डी, ता. केळापूर, जि. यवतमाळ.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.