spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजीव गांधी जयंतीनिमित्त नगर कांग्रेस कमिटी कार्यालयात अभिवादन

कामठी :- कामठी नगर काँग्रेस कमिटी कार्यालय येथे भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या छायाचित्रास माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी माजी सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे ,तुळशीराम काळमेघ,राजकुमार गेडाम सह कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजीव गांधी यांच्या आधुनिक भारताच्या उभारणीत असलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

Popular Articles