spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजधानीत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली :- थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा सर्वांना परिचय करून दिला.

Popular Articles