किशोर साहू, मौदा, ता. २१ :- माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांचा जिल्हा परिषद 15 वित्त आयोग सन 2024-25 अंतर्गत 4.85 लक्ष रुपयाच्या अबंधित विकास निधी अंतर्गत बोरवेल आणि नल कनेक्शन टॅंक लावण्याकरिता काम मंजूर करण्यात आले होते. तसेच पंचायत समिती माजी उपसभापती खेमराज चाफले यांचा १५ वित्त आयोग अंतर्गत बोरवेल साठी २ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले. या कामांचा भूमिपूजन सोहळा आज गुरुवार दिनांक २० नोव्हेंबरला काळा ऑफिस समोर मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडला.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे, माजी पंचायत समिती उपसभापती खेमराज चाफले,सरपंच लुंबिनी कलारे, उपसरपंच रवींद्र ठाकरे , माजी सरपंच महेश कलारे, भूमेशवर चाफले , भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे, उपसरपंच धनराज हारोडे , मोतीराम घरझाडे, धर्मराज बावनकुळे, शैलेश कोपरकर, सुरेंद्र टेंबरे, योगेश निनावे, डॉ.बाबा शेख, सय्यद वहाब अली, इकबाल शेख, इस्माईल शेख ,शाखिर शेख, जान,मेघश्याम कुल्लरकर ,किरण बरबटे , रोशन बरबटे ,अशोक बावनकुळे,मंगेश चांफले , कैलास सोमनाथे ,नंदू मेहर, अजय वाघमारे, सोमराज किरपान, यशवंत भांडारकर, अनिल वाढई, प्रमोद पडोळे, रामचंद्र ढोरे,लक्ष्मन तांडेकर, प्रवीण किरपान, कृष्णा नगरे, प्रेमदास नाटक सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




