– पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शनिवारी अतिवृष्टी आढावा बैठक
यवतमाळ :- राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेत अतिवृष्टी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. होणार आहे.
पालकमंत्री राठोड हे यावेळी मंडळनिहाय अतिवृष्टी आढावा घेतील. त्याचप्रमाणे, मदत निधी वितरण, तसेच पीक परिस्थितीचा आढावाही ते यावेळी घेतील. सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहतील.
जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. प्रत्येक बाबीचा आढावा बैठकीद्वारे घेतला जाईल. नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री राठोड यांनी दिली आहे.




