यवतमाळ :- जिल्ह्यात दूध उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आधुनिक दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान पुरवणे व ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे या प्रमुख उद्दिष्टांसाठी विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
प्रकल्पाची पार्श्वभूमी जिल्ह्यात दररोज सुमारे १, लक्ष ९० हजार,३६५ लिटर दूध उत्पादन होत असून, १, लक्ष 1४ हजार ५९३ लिटर दूधाची कमतरता आहे. टप्पा-१ च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, १६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार टप्पा-२ ला मान्यता देण्यात आली असून, यवतमाळसह विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व १९ जिल्ह्यांत तो राबविण्यात येत आहे.
प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे उच्च दूध उत्पादन क्षमतेची गाई-म्हशी उपलब्ध करणे, वंधत्व निर्मूलन व पशुपालनासाठी आधुनिक सुविधा, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण, चारा पिके व पोषक खाद्य उपलब्धता, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, अनुदान सुविधा उच्च उत्पन्न क्षमतेची जनावरे वाटप ५० टक्के प्रत्यारोपण कालवडी ७5 टक्के पशुप्रजनन पूरक खाद्य 25 टक्के Fat व SNF वाढवणारे खाद्य २५ टक्के बहुवार्षिक चारा पिके१०० टक्के मुरघास खरेदी ३ रुपये प्रति किलो कडबाकुट्टी यंत्र५० टक्के वंधत्व निवारण प्रशिक्षण मोफत जिल्ह्यासाठी एकूण खर्च एकूण प्रकल्प खर्च: ₹२.३९ कोटी राज्य हिस्सा: ₹१.३६ कोटी शेतकरी/पशुपालक हिस्सा: ₹०.९६ कोटी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन), पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी, किंवा जिल्हा प्रकल्प अधिकारी, दुग्ध विकास प्रकल्प, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा.




