पाचगाव :- जिल्हा परिषद हायस्कूल, पाचगाव येथे “प्राचीन शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण पद्धती यामधील सहसंबंध” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल व्यापक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जी.आर.मोटघरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडुसन फाऊंडेशनचे संचालक डॉ. निलेश काळे उपस्थित होते. डॉ काळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचीन शिक्षणपद्धतीतील नैतिक मूल्ये व तत्त्वे आधुनिक जीवनात कशी उपयुक्त ठरतात याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी गुरुकुल प्रणाली, नैतिक शिक्षण, व्यावहारिक जीवनकौशल्ये या गोष्टींवर सविस्तर प्रकाश टाकला. डॉ. काळे यांनी सांगितले की, “आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशाकडे न पाहता, सहनुभूती, आदरभाव, जबाबदारी आणि नैतिक मूल्ये अंगीकारली तरच ते खरे अर्थाने यशस्वी होतील.” योग्य जीवन कौशल्य आत्मविश्वास निर्माण करतो व यशाचा मार्ग सोपा होतो. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अती वापर करण्याऐवजी वाचनाचे प्रमाण वाढविण्याकरिता डॉ काळे यांनी मुलांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षिका रंदई व भोयर यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणातील मूल्यांची जाणीव करून दिली. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संस्कृत श्लोक पठणाने अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. या श्लोकांमधून प्राचीन संस्कृतीतील ज्ञानसंपदा आणि जीवनदृष्टीचे दर्शन घडले. कार्यक्रमाचे दर्शन घडले. कार्यक्रमाचे संचालन व आभार गोपाल ढोबळे यांनी केले.
Home Latest News प्राचीन व आधुनिक शिक्षण पद्धतीतील सहसंबंधावर मार्गदर्शन कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल, पाचगाव...



