spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीत वाचन प्रेरणा दिन साजरा 

किशोर साहू :मौदा, तारीख १९:- भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला जिल्हा परिषद शाळा तोंडली येथे वाचन प्रेरणा दिन साजरा साजरा करण्यात आला.

ते ‘ वाचनाचा नाद म्हणजे ज्ञानाचा झरा’ असे समजत. वाचनाचे महत्त्व प्रत्येकाला समजले पाहिजे यासाठी वाचन प्रेरणा दिनाचे मोल अनमोल आहे. वाचन प्रेरणा दिनाचा विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे बाल ग्रंथालयातील वाचन समृद्ध पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी दिली जातात. संकल्पना व संस्कृतीची ओळख वाचनामुळे होते. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती सर्जनशीलता वाढते.तसेच वाचनामुळे मानसिक व्यायाम होतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मन अधिक तीक्ष्ण होते. वाचनामुळे ज्ञानाचा सागर मिळतो.

यावेळी तोंडली गावचे उपसरपंच रामपाल धांडे, ग्रामसेवक वैभव बावनकर, प्रतिष्टीत नागरिक सुरेंद्र बाभरे,बागडे शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे उपस्थित होत्या.यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन पटावर प्रकाश टाकत प्रेरणादायी भाषणे दिली. विद्यार्थ्याचे भाषण, आत्मविश्वास व वाचन शैली बघून सर्वांनी त्यांचे कौतुक केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.