spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अभिनव कल्पनेतून चमकले ‘जीव्हीपी पॉइंट’  

– मनपाच्या ‘वेस्ट टू बेस्ट’ संकल्पनेचे केंद्रने केले कौतुक

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सतरंजीपुरा झोन मधील लालनगर भागात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानांतर्गत लालनगर भागातील एका जुन्या ‘जी.व्ही.पी. पॉइंट’ अर्थात मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली, तसेच नागरिकांनी पुन्हा कचरा फेकू नये, यासाठी या जागेचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या देखरेखीत विशेष चमू कार्य करीत आहे. मनपाच्या चमूने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हा पॉइंट पूर्णपणे स्वच्छ केला. यानंतर, भविष्यात इथे कोणीही कचरा टाकू नये यासाठी तिथे वॉल पेंटिंग करण्यात आले. तसेच ‘वेस्ट टू बेस्ट अर्थात कचऱ्यापासून सर्वोत्तम कलाकृती या संकल्पनेचा वापर करून त्या जागेला एक आकर्षक आणि प्रेरणादायी स्वरूप देण्यात आले. या अभिनव कल्पनेचे केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत मिशन शहरने’ आपल्या अधिकृत सोशल मीडिया स्थळांवर शेअर करीत कौतुक केले आहे.

मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी या कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी स्वच्छता आणि सौंदर्यीकरण अभियानात स्थानिक नागरिकांनी केवळ उपस्थिती नव्हे, तर सक्रियरित्या सहभाग नोंदविला. नागरिकांनी स्वतःच्या हाताने साफसफाईच्या कामात मदत केली आणि परिसराच्या या बदलाचे तोंडभरून कौतुक केले.

Popular Articles