spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हंसराज, भंडारा :- भंडारा शहरातील आंबेडकर वार्डात एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, या प्रकरणातील नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्डातील अंगणवाडीत ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास रोहित वासनिक या नराधमाने एका साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे माणुसकीला काळीमा फासली गेली असून जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून तो अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या सुळसुळाटाकडे वेधले लक्ष निवेदनात नमूद केल्यानुसार, भंडारा जिल्ह्यासह शहरी भागात मागील काही वर्षांपासून गांजा, एम.डी. सारख्या अमली पदार्थांची विक्री आणि सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तरुण पिढी या व्यसनांच्या विळख्यात अडकत असून त्यातूनच अशा प्रकारची क्रूर गुन्हेगारी जन्म घेत आहे. शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर उघडपणे दारू पिण्याचे प्रकार सुरू असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. तसेच अमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांवर कठोर कायदे करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

हे निवेदन देतेवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, चित्रगंध सेलोकर, राजेश ठवकर, नितेश गभणे, संतोष चांदेवार, अनिरुद्ध गाढवे, शामराव मालखंडाळे, योगेश पवनकर, गोलू कांबळे, मोनू हेडाऊ व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.