spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रेमचंद उत्सवानिमित्त ‘अलगोझा’ व ‘जुलूस’ नाटकांचे हृदयस्पर्शी सादरीकरण

नागपूर :- प्रेमचंद जयंतीनिमित्त चिटणवीस सेंटर येथे चिराग नाट्य संस्था आणि आर्टिस्ट क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अलगोझा’ आणि ‘जुलूस’ या दोन नाटकांचे अत्यंत हृदयस्पर्शी सादरीकरण करण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून चिराग नाट्य संस्थेतर्फे राजेंद्र शुक्ला, संजय कुमार, प्रदीप पाराशर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने दरवर्षी प्रेमचंद उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात प्रथम सादर करण्यात आलेल्या ‘अलगोझा’ या नाटकाचे नाट्यरूपांतर रेणुका साहू यांनी केले असून, दिग्दर्शन मिलिंद धोतकर यांनी केले. त्यानंतर ‘जुलूस’ या नाटकाचे नाट्यरूपांतर चित्रा मुदगल यांनी तर दिग्दर्शन राजेंद्र शुक्ला यांनी केले. या दोन्ही नाटकांमध्ये अरविंद पांडे, प्रियंका ग्वाल, मेघा मिराचे, खालिद शेख, आकाश भारद्वाज, संकेत राऊत, मोईन कच्छी, आफताब, साक्षी गुमगावकर, डॉ. कृष्णकुमार द्विवेदी, रवि हाटेकर, नितीन ठाकरे, राजेंद्र शुक्ला आणि आशीष पवार यांनी प्रभावी अभिनय साकारला. कार्यक्रमासाठी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जायसवाल यांच्यासह ओमप्रकाश भागवानी, हितेश भागवानी, लतीफ सिद्दीकी आणि राधाकृष्ण नायर यांनी विशेष सहकार्य केले.

नाटकाच्या रंगभूषेची जबाबदारी नुकूल श्रीवास यांनी, वेशभूषा सुवर्णा नलोडे यांनी, ध्वनी व प्रकाश व्यवस्था किशोर वतासे आणि अनिल भालेराव यांनी, तर संगीत संयोजन मनीष चौधरी आणि हितेश चोप्रा यांनी सांभाळले. प्रस्तुती नियंत्रण व सहाय्यक म्हणून प्रदीप पाराशर, संकेत राऊत, सुरेश मून आणि गुरुदीप सिंह कपूर यांनी योगदान दिले.

यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक रवींद्र दुरुगकर, कल्पना शुक्ला (दीदी), लतीफ सिद्दीकी, नितीन वानसोड, विजय गुमगावकर, रोशनी सेलोकर, मोना नायर, शक्ती रतन, संजय कुमार, प्रदीप पाराशर, चिराग शुक्ला, योगेश हटवार, सय्यद मुमताज, अनिल भालेराव, प्रकाश कडू तसेच सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी लोहिया अध्ययन केंद्र तसेच राजेंद्र शुक्ला मित्र मंडळाचे विपुल मिश्रा, राजेश गुप्ता, राजेश तिवारी, सुदेश गुप्ता, आनंद शर्मा, संतोष कटारिया, झामन गेहानी आणि रवि हाटेकर यांनी विशेष सहकार्य केले. प्रेमचंद यांच्या साहित्यिक विचारांचा आणि सामाजिक संदेशाचा प्रभावी आविष्कार या नाट्यप्रयोगांतून घडल्याने उपस्थित रसिकांनी कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.