Home Latest News दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदी हेमराज बागुल रुजू

दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदी हेमराज बागुल रुजू

0

<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार संचालक हेमराज बागुल यांनी नुकताच स्वीकारला&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी बागुल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले&period; महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे यावेळी उपस्थित होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>बागुल महासंचालनालयातील ज्येष्ठ संचालक असून ते मंत्रालयातील मुख्यालयात संचालक &lpar;प्रशासन&rpar; या पदावर कार्यरत होते&period; त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे&period; शासकीय सेवेत येण्यापूर्वी बागुल यांनी पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान दिले आहे&period; तसेच साहित्यविषयक विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनीही बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version