– पैशाची मागणी होत असल्यास एसडीओकडे तक्रार करावी
भंडारा :- उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग/राज्यमार्ग विशेष क्रमांक 07, 08 व 8अ करीता भूसंपादनाचे काम सुरु असून सदर कामाकरीता शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्याकडे लाच (पैशाची मागणी) मागत असतील, तर त्यांना पैसे देऊ नका. लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा असून पैशाची मागणीबाबत तक्रार असल्यास उपविभागीय अधिकारी, भंडारा यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन उपविभागीय अधिकारी भंडारा विकास व्यवहारे यांनी केले आहे.