Home Latest News दमयंतीताई देशमुख महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

दमयंतीताई देशमुख महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

0
54

सचिन चौरसिया,रामटेक :- स्थानिक दमयंतीताई देशमुख बी.एड. व डी.एड. कॉलेज, रामटेक येथे संस्थाध्यक्ष रविकांत रागीट यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री देशमुख यांच्या शुभहस्ते व प्रा. तिमांडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या महत्त्वाची जाणीव करून देत शिक्षकांना पुष्पगुच्छ अर्पण करून शुभेच्छा दिल्या तसेच हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

या निमित्ताने विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विषयक भाषणे, कविता व लघुनाटिका सादरीकरण करून कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमात बी.एड. व डी.एड. विभाग प्रमुख प्रा. किरण शेंद्रे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्व समजावून सांगितले. प्रा. अनिल मिरासे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे स्थान व महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी अध्यापक विद्यालयातील प्रा. उर्मिला नाईक, प्रा.निकिता अंबादे, प्रा. सविता तायवाडे, प्रा. पारुल झाडे, प्रा. राजश्री माहुले, प्रा. विलास मडावी, प्रा. कला मेश्राम, प्रा. देवानंद नागदेवे, प्रा. अंकित तडस, प्रा. धम्मदीप खोब्रागडे, अतुल बुरडकर, गीता समर्थ, सुरेश कारेमोरे, स्नेहा गाथे, सतीश कळंबे, अनिल बोरकर, वर्षा माहुरकर, वनिता आकरे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन प्रिया भोले यांनी तर आभार प्रदर्शन नंदिनी अवथरे यांनी केले.