Home Latest News मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार,राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन...

मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार,राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन क्विझ स्पर्धेचे आयोजन

0
136

गडचिरोली :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मेरा युवा भारत युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाच्या वतीने १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत माय भारत (mybharat.gov.in) पोर्टलवर विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझ आयोजित करण्यात येत आहे. ही क्विझ विशेषत: १५ ते २९ वयोगटातील तरुणांसाठी तयार करण्यात आली आहे.

सहभागींना १० मिनिटांच्या कालावधीत २० बहुपर्यायाी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील:

ही क्विझ मोफत आहे आणि देशातील १२ प्रमुख भाषांमध्ये सोडवता येते. टॉप 10 हजार विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि बक्षिसे दिली जातील. तसेच सर्वोतम कामगिरी करणाऱ्या तरुणांना विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये सामील होऊन पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळेल. विजेत्यांची निवड पूर्णपणे पारदर्शक संगणक आधारित लॉटरी प्रणालीद्वारे केली जाईल. यावेळी मेरा युवा भारत गडचिरोली जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांनी आवाहन केले. ही क्विझ केवळ एक स्पर्धा नाही, तर भारताचे भविष्य घडवण्यासाठी तरुणांच्या विचारसरणी आणि उर्जेवर लक्ष केंद्रित करण्याची एक सुवर्णसंधी आहे.

स्पर्धेत कसे सहभागी व्हावे सहभागी mybharat.gov.in ला भेट द्यावी. ज्यांनी अद्याप या पोर्टलकर नोंदणी केलेली नाही त्यांनी प्रथम नोंदणी करा बटणावर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी. आधीच नोंदणीकृत सहभागी लॉग इन करून आणि विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझवर क्लिक करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. असे जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, गडचिरोली यांनी कळविले आहे.