spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

याचं घरटं सांगतंय पाऊस कसा पडणार? 

◼️शास्त्रज्ञांपेक्षाही हुशार आहे ‘हा’ पक्षी!

◼️पावसाचे संकेत देणारे घरटे झाले दुर्मिळ

◼️कावळ्याच्या घरट्यांवरून अंदाज, पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात

सचिन चौरसिया, रामटेक :- पावसाळ्यापूर्वी यंदा किती पाऊस पडेल, जोरदार वादळ येईल की फक्त रिमझिम पाऊस होईल, हे जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांनाच असते. ज्या काळात हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा नव्हती त्याकाळात पक्ष्यांचे आवाज आणि पावसाळ्यापूर्वी झाडावर बांधत जाणारी कावळ्यांची घरटी कोणत्या स्वरूपात बांधली यावरून शेतकरी पावसाचे अंदाज व्यक्त केले जात आणि ते खरे ठरत. पण आता मानवी हस्तक्षेपामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून पावसाचे संकेत देणारे कावळ्याचे घरटे दुर्मिळ झाले आहेत. पण, आता मानवी हस्तक्षेपामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने पावसाचे संकेत देणारे कावळ्याचे घरटे शिरपूर जैन परिसरात दुर्मिळ झाले आहेत. पावसाळा सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वी कावळ्यांचा विणीचा हंगाम असतो. या काळात नर, मादी झाडावर गोलाकार घरटी बांधायला सुरुवात करतात. ग्रामीण भागात तर कावळे घरटी बांधतेवेळी काडी तोंडात कशी धरतात. यावरूनही पावसाचे अंदाज व्यक्त केल्या जात असे. जर कावळ्याने काडी चोचीत मधोमध धरली तर मधले नक्षत्र भरपूर बरसणार असे संकेत बांधले जायचे. जर कावळ्याने चोचीत काडी टोकावर धरली तर या वर्षात सुरुवातीला पाऊस नाही, शेवटचे नक्षत्र बरसणार असा अंदाज व्यक्त केला जात असे. पानकोंबडी, पावश्या, मोर या पक्ष्यांच्या पावसापूर्वीच्या ओरडणे वरून पाऊस येणार असल्याचे संकेत शेतकऱ्यांना मिळत होते. डोंगरी व ग्रामीण भागात रोहिणी नक्षत्र सुरू झाला की, जून महिन्याच्या प्रारंभापासून पक्षी जोरात जोरात ओरडून एकमेकांचा पाठलाग करताना दिसतात. विणीच्या हंगामात नर, मादीची घरटी बांधण्याची लगबग हे पावसाचे संकेत देते. पण, पक्ष्यांची होणारी अवैध शिकार आणि वृक्षतोडीमुळे पक्ष्यांची संख्या घटली. कावळ्याची काव.. काव.., चिमणीची चिव चिव, मोराचा.. केका पहाटेच्या समयी परसबागेत ऐकायला येणारे पक्ष्यांचे मंजुळ स्वरमुक्त झाले. आधारित अनेक आजकाल हवामानशास्त्र बरेच प्रगत झाले. हे खरे असले तरी ग्रामीण भागातील लोकं पावसाचे अंदाज हे सामान्यपणे पारंपरिक ज्ञानावर ठोकताळ्यावरून लावत असतात. पाऊस येईल, त्याचे प्रमाण किती म्हणजे कमी किंवा जास्त असेल, याचे अनेक ठोकताळे निसर्ग निरीक्षणातून विकसित झालेले आहे.

घरटे मधोमध असेल तर समाधानकारक पाऊस

कावळ्यांचे घरटे बोर, जांभूळ, बाभूळ, सावळ यासारखे काटेरी झाडावर कावळ्याचे घरटे आढळल्यास कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाते. तर आंबा, निंब, अर्जुन, करंज, चिंच यासारख्या झाडावर घरटी केल्यास चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. शेतकरी सांगतात कावळ्याने झाडाच्या मधोमध ३ फांद्यांच्या बेचक्यात घरटे बांधले, तर त्यावर्षी समाधानकारक पाऊस होतो. तसेच, झाडाच्या शेंड्यावर घरटे बांधले असेल तर मध्यम पाऊस पडत असल्याचा अंदाज जुने जाणकार आजही व्यक्त करतात.

Popular Articles