spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पशुपालकांच्या सुविधेसाठी आता ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा; पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

हंसराज भंडारा :- राज्यातील पशुवैद्यकीय सेवा अधिक गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड (इंडसइंड बँक) यांच्या संयुक्त विद्यमाने १९६२ टोल-फ्री हेल्पलाईनसह आता ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या पशुवैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन मिळणे सोपे झाले आहे.

गेल्या पाच वर्षांत ‘१९६२’ या हेल्पलाईन आणि फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांद्वारे राज्यातील ८ लाखांहून अधिक जनावरांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या यशानंतर, तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी +91 9063142299 हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे.

अशी मिळेल सेवा: शेतकरी या क्रमांकावर “Hi” पाठवून किंवा QR कोड स्कॅन करून चॅटबॉटशी जोडू शकतात. याद्वारे पशुधनाचे आजार, उपचार, लसीकरण आणि सरकारी योजनांची माहिती मिळेल. विशेष म्हणजे, गरज भासल्यास पशुवैद्यकीय डॉक्टरांशी ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद (टेलिकन्सल्टेशन) साधण्याची सोयही यात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना होणारे फायदे:

– जनावरांच्या आरोग्यासाठी त्वरित तज्ज्ञ मार्गदर्शन.

– दवाखान्यात जाण्याचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार.

– सरकारी योजनांची अद्ययावत माहिती उपलब्ध.

– आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद.

ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत ६०० हून अधिक शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला असून, पशुपालकांनी या डिजिटल सेवेचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

Popular Articles