Home Latest News अधिक मासानिमित्त सोमवती अमावस्येला भव्य तुलादान कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

अधिक मासानिमित्त सोमवती अमावस्येला भव्य तुलादान कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

0
25

नागपूर :- अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त सोमवती अमावस्येच्या शुभमुहूर्तावर मारवाडी सम्मेलन, मारवाडी युवा मंच आणि मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तुलादान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक उपक्रमात ६१ भाविकांचे तुलादान करण्यात आले, तर ५१ ब्राह्मणांना भोजन घालून त्यांना दक्षिणाही प्रदान करण्यात आली. कार्यक्रमा दरम्यान गोपूजन, हवन, दीपदान तसेच विविध धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले. तुलादानामध्ये गायींसाठी हिरवा चारा, घास, ढेबी, गूळ आणि चणा डाळ यांचे दान करण्यात आले. या उपक्रमातून गोसेवा, धर्मसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. यावेळी बाबूजी रमेश बंग, विदर्भ प्रमुख महेश बंग, अध्यक्ष कन्हैया मंत्री, सचिव हेमंत शर्मा, मिडटाउनच्या अध्यक्षा अंजली मंत्री, सचिव डॉ. प्राची अग्रवाल यांच्यासह माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल, दीपक अग्रवाल आणि सचिन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मीना सावल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पीडीएस सदस्यांनी परिश्रम घेत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद योगदान दिले. धर्म, सेवा आणि श्रद्धाभाव यांचा संगम घडविणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.