Home Latest News अधिक मासानिमित्त सोमवती अमावस्येला भव्य तुलादान कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

अधिक मासानिमित्त सोमवती अमावस्येला भव्य तुलादान कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त सोमवती अमावस्येच्या शुभमुहूर्तावर मारवाडी सम्मेलन&comma; मारवाडी युवा मंच आणि मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तुलादान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; या धार्मिक उपक्रमात ६१ भाविकांचे तुलादान करण्यात आले&comma; तर ५१ ब्राह्मणांना भोजन घालून त्यांना दक्षिणाही प्रदान करण्यात आली&period; कार्यक्रमा दरम्यान गोपूजन&comma; हवन&comma; दीपदान तसेच विविध धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले&period; तुलादानामध्ये गायींसाठी हिरवा चारा&comma; घास&comma; ढेबी&comma; गूळ आणि चणा डाळ यांचे दान करण्यात आले&period; या उपक्रमातून गोसेवा&comma; धर्मसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला&period; यावेळी बाबूजी रमेश बंग&comma; विदर्भ प्रमुख महेश बंग&comma; अध्यक्ष कन्हैया मंत्री&comma; सचिव हेमंत शर्मा&comma; मिडटाउनच्या अध्यक्षा अंजली मंत्री&comma; सचिव डॉ&period; प्राची अग्रवाल यांच्यासह माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल&comma; दीपक अग्रवाल आणि सचिन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती&period; कार्यक्रमाचे संचालन मीना सावल यांनी केले&period; कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पीडीएस सदस्यांनी परिश्रम घेत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद योगदान दिले&period; धर्म&comma; सेवा आणि श्रद्धाभाव यांचा संगम घडविणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version