spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मी अभिलेख विभागातर्फे 17 हजार 444 प्रकरणांची ई-मोजणी करून नकाशा (क प्रतीचे ) वितरण

– भूमी अभिलेख उपसंचालकांचा खुलासा

– ई- मोजणीसाठी 472 रोव्हर उपलब्ध

– ई- मोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करणार

नागपूर :- नागरिकांना जमिनीची ई- मोजणी करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करण्यात येत असून ई-मोजणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जापैकी 17 हजार 444 अर्जदारांना नकाशा ( क प्रत ) वितरित करण्यात आला असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक विभागाचे भूमि अभिलेख उपसंचालक डॉ लालसिंग मिसाळ यांनी आज दिली.

जमिनीची ई – मोजणी अचूक व वेगाने होण्यासाठी विभागात 472 रोव्हर उपकरणांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यात येत असून 28 जुलै अखेर ई- मोजणीसाठी प्राप्त झालेल्या प्रकरणांमध्ये अर्जदारणा नकाशा देण्यासाठीचे जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. एप्रिल पासून ई-मोजणीसाठी 27 हजार 831 अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 17 हजार 444 प्रकरणात मोजणी करून अर्जदारांना नकाशा देण्यात आला आहे. विभागाकडे केवळ दहा हजार 387 प्रकरणे प्रलंबित असून त्वरित निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भूमि अभिलेख उपसंचालक डॉ लालसिंग मिसाळ यांनी आज दिली.

ई- मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत असून प्राप्त झालेल्या अर्जा नुसार क्षेत्रीय पातळीवर मोजणीचे नियोजन करण्यात आले आहे. उपरोक्त मोजणी प्रकरणे भुकरमापकास 15 प्रमाणे तसेच कार्यालयीन काम सांभाळून मोजणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रत्येकी आठ याप्रमाणे देण्यात येत आहे. विभागात जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या निधीमधून 251 रोव्हर्स ची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे मोजणी मध्ये अधिक गतिमानता येईल.

ई- मोजणीसाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी आगस्ट व सप्टेंबर या महिन्यात ई-मोजणीचे नियोजन करण्यात आल्यामुळे नागरिकांना जलद व अचूक सेवा देण्यासाठी भूमी अभिलेख विभाग कटीबद्ध असल्याची माहिती उपसंचालक डॉ लालसिंग मिसाळ यांनी दिली आहे.

Popular Articles