किशोर साहू, मौदा :- बुधवार (ता. 29 जुलै) रोज ला प्रनाग हायस्कूल आजनगाव येथे गुरु पौर्णिमा (आषाढ पौर्णिमा) निमित्ताने शाळेचे शिक्षक गुणरत्न गजभिये यांनी शाळेस विविध प्रजातीचे वृक्षदान केले. मागील 5-6 वर्षापासून वृक्षदान, त्यांची लागवड व संगोपन हा उपक्रम विद्यार्थी, पालक, नागरिक व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने संयुक्त उपक्रम म्हणून शाळेत दरवर्षी राबविला जात आहे.
यावर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे दुहेरी कार्यक्रमाचे उपयोजन करण्यात आले.

गुरु पौर्णिमा व वृक्षारोपण हा कार्यक्रम शाळेचे माजी विद्यार्थी, पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. आजच्या दिवसाचे महत्त्व व गुरुजनांचे स्थान याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
परीसंस्थेतील झाडाचे महत्त्व, मानवासाठी व जगण्यासाठी झाडाचे महत्त्व, निसर्गाच्या समतोलासाठी झाडाचे महत्त्व इ. घटक विद्यार्थ्यांना समजावून, झाडे जगवा, पृथ्वी वाचवा, हा संदेश प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी शाळेत दरवर्षी हा कार्यक्रम राबविला जातो.
कार्यक्रमाला माजी उपसरपंच रवींद्र फटिंग, चांगदेव मोटघरे, दत्तू ठोंबरे, पोलिस मित्र स्वरा साठवणे, करण सुर्यवंशी, मोतीलाल ठोंबरे, संकल्पना संयोजक गुणरत्न गजभिये सह शाळेचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक बाबुलकर , शिक्षकवृंद सुरेश टांगले, राजू गेडाम, लिपिक सुनील डोंगरे, मदतनीस मुंगाटे, क्षिरसागर उपस्थित होते व या सर्वांनी मिळून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.





