spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द – गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई :-  परवानगीशिवाय हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येतील. अशी घटना ज्या क्षेत्रामध्ये घडेल त्या क्षेत्रातील पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य दादाराव केचे यांनी आर्वी (जि.वर्धा) तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसायबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला.

गृह राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, आर्वी (जि.वर्धा) तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसाय तक्रारींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात आली असून कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तरीही लोकप्रतिनिधींच्या सूचनांची पुन्हा दखल घेत या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येईल. ही चौकशी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत केली जाईल. या चौकशीत कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी दिली.

Popular Articles