spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तत्काळ बंद करा रिपा. भीमशक्ती संघटनाची मागणी-चंद्रशेखर भीमटे.

कन्हान ०५ : कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत वाढलेले अवैध धंद्यांवर कारवाई करुन त्वरीत बंद करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन भीम शक्तीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कन्हान पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांना दिले. यावेळी पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी निवेदन स्वीकारून अवैध धंद्यावर अंकुश लावून कारवाई करण्याचे आश्वस्त केले.
पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. कन्हान परिसरात वाळू, कोळसा, जनावरे वाहतुक, सट्टा,जुगार, सुंगधित तंबाकु, गांजा,देह व्यवसाय, अवैध दारु विक्री, एमडी अर्मलपदार्थ सारखे अवैध धंदे जोमाने शुरु आहेत. नशा करणाऱ्यावर व अवैध धंदे करणाऱ्यावर अपराधीत वृत्तीवर पोलीसांचा धाक नसल्यामुळे, अपराधिक वृत्तीचे मनोबल वाढत आहेत. किंबहुना मनोबल फोफावत आहे .कन्हान पोलीस स्टेशन कार्यालयात अपराधिक वृत्तीचे वावर सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्यामुळे पोलीसांचा धाक अपराधिक वृत्तीच्या लोकांमध्ये कमी होत आहे. व सामान्य नागरिकात यामुळे पोलीसांची प्रतिमा मलीम होत आहे, तसेच यामागे कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवहार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, यामध्ये डीबी पथका सह कर्मचाऱ्यांचे मोबाइल सीडीआर काढला तर अपराधिक व्यकितना संरक्षण देण्याचे पुरावे समोर येतील.
अश्या कृत्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा धुमिल होत आहे. अश्या अपराधी वृत्तीच्या लोकांनावर आळा घालण्याचे अत्यंत गरजेचे आहेत.  कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत संपूर्ण अवैध धंद्यावर कारवाई करून. अपराधी वृत्तीच्या लोकांन वर मोका, मोकोका, एम.पि.डी.आय, तसेच विविध धारा लावून तत्काल कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदना द्वारे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार नागपूर ग्रामीण, तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना प्रेषित केली. मोठ्या प्रमाणात रेती चोरी व सट्टा जुगार : कन्हान शहरा सह ग्रामीण भागात सत्रापुर सिहोरा, निलज खंडाळा, नरसाळा, पिपरी गाडेघाट, जूनिकामठी, घाटरोहणा, नांदगांव, एसंबा सह ग्रामीण भागात जोमात सुरू आहे. याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथक प्रमुख डीवायएसपी अनिल मस्के यांनी विशेष लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे. यावेळी प्रामुख्याने मनोज गोंडाने, नितीन मेश्राम, रवींद्र दुपारे, राजेश फुलझेले, रॉबिन निकोसे सह रिपब्लिकन भीमशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.