spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बुटीबोरी येथे महीलांची छेड काढणाऱ्या अज्ञात आरोपीचा तात्काळ घेतला शोध – बोरी पोलीसांची तत्पर कारवाई

 

बुटीबोरी | ५ जुलै २०२५
बुटीबोरी परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांची छेड काढणाऱ्या अज्ञात तरुणाचा बोरी पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन अटक केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या घटनेवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

दिनांक २ जुलै २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता, दोन महिला दत्ता मेघे रिक्रिएशन सेंटरसमोरील गल्लीतून मॉर्निंग वॉक करत असताना एका अंदाजे २० वर्षांच्या तरुणाने मोटारसायकलवर येत त्यांच्या समोर उभा राहून आपले कपडे काढून अश्लील हावभाव करत गुप्तांग दाखवले. महिलांनी घाबरून घटनास्थळावरून पळ काढला.
याच प्रकारची दुसरी घटना ४ जुलै रोजी पुन्हा सकाळी ६:३० वाजता घडली. त्यानंतर संबंधित महिलांनी तातडीने बोरी पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली.

महिलांकडील मोबाईलमधील फोटोच्या आधारे पोलीसांनी तत्काळ आरोपीच्या शोधाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग करून पोलिसांनी आरोपीचा स्पष्ट फोटो मिळवला. गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी महावीर किरणा दुकानात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई केली.

आरोपीचे नाव निषाद औरंगजेब खान (वय १९ वर्षे, रा. सातगाव, तुरकमारी) असे असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादी महिलांच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलीस स्टेशन येथे कलम ७८(१), ७९, २९६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांत पोलिसांप्रती विश्वास वाढत आहे. बुटीबोरी पोलिसांच्या कार्यवाहीचे परिसरात कौतुक होत आहे.

Popular Articles