किशोर साहू, मौदा, ता.२५:- दरवर्षीप्रमाणे यंदाही मौदा तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या व पारशिवनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या खेडी मध्ये नवयुवक शारदा उत्सव मंडळातर्फे शारदा उत्सव साजरा करण्यात येत असून शनिवार ( दि. 25 ऑक्टोंबर) दुपारला ह भ प लोडेकर महाराज व राजेंद्र ठाकरे यांच्या हस्ते विधिवत हवन पूजन करण्यात आल्यानंतर सायंकाळला मंडळाला प्रोत्साहन देणारे कन्हान येथील संतोष ठाकरे व कामठी येथील मूर्तिकार भाऊराव चौधरी यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आज रविवार (दि. 26 ऑक्टोबर)ला मिरवणुकीसह भव्य विसर्जनाचे आयोजन करण्यात येणार आहे .
शारदा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष राजकुमार गजबे ,उपाध्यक्ष तुकेश घरजाळे, सचिव विठ्ठल वैद्य ,सदस्यगण विजय गजबे, अजय गजबे, चेतन गजबे ,नकुल गजबे ,ऋषिकेश वैद्य, जितेंद्र वैद्य, विलास ठाकरे, रोशन ठाकरे, दुर्गेश मेश्राम ,मयूर काळे, चुडामन नारनवरे, आश्विन नारनवरे ,राजू चौधरी ,दीपक इंगळे ,नरेश इंगळे ,कुंदन मेश्राम, शेषराव मेश्राम, प्रमोद गजबे, खुशाल शेंडे ,देवेंद्र सहारे ,महेंद्र उमाळे, आयुष उमाळे, ज्ञानेश्वर उमाळे, प्रफुल उमाळे, सुनील उमाळे, महेंद्र मरसकोल्हे, साहिल मेश्राम ,तेजस चौधरी, लक्ष्मीकांत घरजाळे, कृष्णा चौधरी, प्रशांत मरसकोल्हे, विजय मरसकोल्हे सह ग्रामस्थ सहकार्य करीत आहे.








