spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सम्यक थिएटर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनच्या विद्यमाने विशेष प्रयोगाचे आयोजन आज

– रौप्य महोत्सवी वर्षातील महानाट्य ‘महासूर्य’

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पहिले महानाट्य ‘महासूर्य’चा विशेष प्रयोग 26 ऑक्टोबर रोजी कवीश्रेष्ठ सुरेशभट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे दुपारी 3 वाजता. आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पहिले महानाट्य, अशी सांस्कृतिक इतिहासात नोंद झालेले ‘महासूर्य’ हे महानाट्य नागपूरकरांनी अत्यंत सामर्थ्याने निर्माण केले आणि ज्यामुळे नागपूरकर कलावंतांचे नाव सर्वदूर पसरले; त्या ऐतिहासिक कलाकृतीला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत. ‘महासूर्य’ या महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक डॉ. सुनील रामटेके हे असून निर्मिती सम्यक थिएटरने केली आहे. सम्यक थिएटर या संस्थेनेही 25 वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्ताने सम्यक थिएटर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन या दोन्ही संस्थांनी मिळून या विशेष प्रयोगाचे आयोजन केले आहे. 25 वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अशी भव्य कलाकृती निर्माण करण्याचे स्वप्न नागपूरकर रंगकर्मीनी पाहिले आणि ते यशस्वी झाले. अनेक अंगांनी ही कलाकृती अत्यंत सक्षम असल्याची पावती सर्व स्तरातून मिळाली आहे. एक अनोखी आणि सामाजिक, सांस्कृतिक व कलात्मक दृष्टिकोनातून उत्तम अशी कलाकृती निर्माण करण्याचे श्रेय नागपूरकर रंगकर्मीना नक्कीच आहे. या कलाकृतीचे सौंदर्य अजोड आहे. सलग तीन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. महासूर्य आणि सम्यक थिएटर यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जानेवारीमध्ये करण्यात येणार आहे. लोक सहभागातून हे संपूर्ण आयोजन करण्यात येणार असून त्यासाठीच ‘महासूर्या’चा विशेष प्रयोग लोकसहभागातूनच आयोजित करण्यात आलेला आहे. प्रस्तुत महानाट्याच्या प्रयोग प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, गिरीश गांधी, प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. संजय रामटेके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधवी खोडे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव तसेच इ. झेड. खोब्रागडे, डॉ. हिरेन नगराळे, अशोक गेडाम उपस्थित राहतील. अशी माहिती सम्यक थिएटरचे संयोजक नरेश साखरे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी डॉ.सुरेश चवरे, पी.एस. कुमार, डॉ.सुनील रामटेके, श्रीकृष्ण ढोले, इंजि. सुरेश खोब्रागडे, वैशाली गोस्वामी, लीलेश्वर जवादे, सुखदेव सोंडवले, छाया वानखेडे उपस्थित होते.

Popular Articles