spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शैक्षणिक प्रश्न व पत्रकारितेतील बदलांवर सखोल संवाद

– आदर्श शिक्षण संस्थेव्दारे पत्रकारांचा सत्कार 

कन्हान :- आइडियल एजुकेशन सोसाइटी द्वारा संचा लित आदर्श हायस्कूल कन्हान व आइडियल कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळा कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा सन्मान व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव भरत साळवे, प्रमुख अतिथी मा.एन एस मालविये, शाळेचे मुख्याध्यापक जी डी यादव आदी च्या हस्ते पूजनिय सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार एन एस मालविय, अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, कमल यादव, सुनील सरोदे, मोहन रंगारी, ऋषभ बावनकर व विवेक पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

उपस्थित पत्रकारांनी आपल्या मनोगतातुन शाळांसमोरील सध्याच्या समस्या, मराठी व हिंदी माध्यमांच्या शाळा ओस पडण्याची कारणे, शिक्षक व विद्यार्थ्यांसमोरील अडचणी यावर प्रकाश टाकला. तसेच पत्रकाराची भूमिका काय असावी, लेखणीची जबाबदारी, आधीची व आजची पत्रकारिता यातील फरक, प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी या बाबत आपले अनुभव प्रांजळपणे मांडले. यावेळी पत्रकारांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सकारात्मक, प्रामाणिक व समाजाभिमुख पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकवृंदांनीही पत्रकारांशी संवाद साधत शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव व समस्या मांडल्या.पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचा गौरव म्हणुन आदर्श शिक्षण संस्थेच्या वतीने हा सन्मा न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमास आदर्श हायस्कूल कन्हान व आइडियल कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळेचे शिक्षक मनोज डोंगरे, अलंकार राखडे, शैलेश सोलंकी, प्रशांत वैद्य, विजया मुंडले, प्रीती बोपचे, प्रतिभा तिघरे, पुजा तिवारी, रक्षा शुक्ला, सुरेश वंजारी, जगदीश दुबे, अरविंद नेवारे आदीसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.