spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मौदा तालुक्यात मजुरांकडून गहू कापणी, मशीने कापणी,मळणी अनं सोबतच विकायला सुरुवात

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील गावा – गावातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील गहू कापायला आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी, मळणी व सोबतच गव्हाचे पीक विकायला सुरुवात केलेले आहे. येसंबा परिसरातील शेतकऱ्यांनी मजुरांच्या हाताने तर खापरखेडा (तेली) ,नरसाळा परिसरातील शेतकऱ्यांनी मशीननेच गहू पिकाची कापणी ,मळणी करायला सुरुवात केलेली आहे. सध्या गव्हाचे भाव 2100 ते 2200 रुपये असल्याचे आजनगाव येथील सकाळी पान टपऱ्यावर बसलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

तालुक्यातील अनेक शेतकरी गव्हाचे पीक शेताच्या बांध्यावरच व्यापाऱ्यांना विकत असल्याचे शेतकरी सांगत आहे. नवीन गहू निघण्यापूर्वी जुन्या गावाचे भाव तीन हजार रुपये होते असेही शेतकऱ्यांनी चर्चा करताना सांगितले. यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने धान पीक समाधानकारक झाले होते तर हिवाळ्यातही कडाक्याची थंडी पडल्याने गहू पीकही समाधानकारक होत असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.