खापा :- मंगळवारी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये प्रभाग क्र. ८ अ मधून अनुसूचित जमाती महिला या जागेसाठी माधुरी मोरेश्वर धुर्वे काही कागदपत्रे कमी असल्यामुळे आणि प्रभाग क्र. ८ ब मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला या जागेसाठी वैभव रमेश निमजे मनसे पक्षातून अर्ज दाखल केला पण पक्षाचा बी जोडपत्र जोडलेला नव्हता म्हणून अवैध ठरला आणि प्रभाग क्र. ९ ब सर्वसाधारण खुला जागेसाठी व्यंकटेश पेंटेय्या तालपल्लीवार यांनी काँग्रेस पक्षाकडून अर्ज दाखल केला पण बी जोडपत्र जोडलेले नव्हते म्हणून या तीन नगरसेवक उमेदवारांचे आणि अध्यक्ष पदाधिकारीता भाजपकडून अंकिता पियुष बुरडे यांनी दाखल केलेले अर्जाला बी जोडपत्र जोडलेले नव्हते म्हणून अवैध ठरविण्यात आले आहेत. उर्वरित नगरसेवकांचे ५८ आणि पाच अध्यक्ष पदाकरीता नामांकन दाखल केलेले अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहलता पाटील आणि सहायक निर्णय अधिकारी किरण बगडे यांनी दिली.
नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये एक अध्यक्ष व तीन नगरसेवक उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



