– धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत उपक्रम
– शिवार फेरीतून जन जागृति
किशोर साहू, मौदा, ता. १:- गट ग्राम पंचायत इंदोरा येथे नुकतेच आदिसेवा केंद्राचे उद्धाटन धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत करण्यात आले. गावातून शिवार फेरी काढून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.या प्रसंगी गावतील सरपंच नेकसिंग गहेरवार , उपसरपंच नकुल लोनीया, ग्रामपंचायत अधिकारी जयेंद्र सोलंकी, आरोग्य विस्तार अधिकारी मोहन विरकूडे, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा नवनिया, सारिका लोणारे , ऋषिराज सेंगर, सह सर्व ग्राम पंचायत सदस्यगण व गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी संकेत मरस्कोले यांनी सांगितले की, या आदिसेवा केंद्रामुळे आदिवासी बांधवांना एका छताखाली सर्व शासकीय योजनांची माहिती, लाभ व सुविधा उपलब्ध होतील, त्यांच्या अडचणींचे निराकरण अधिक सुलभ होईल.








