Home Latest News २३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक लखबिर सिंह लक्खा यांचा जगराता कार्यक्रम

२३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक लखबिर सिंह लक्खा यांचा जगराता कार्यक्रम

0
71
पांढरकवडा १२ : शहरातील नवमित्र दुर्गात्सव मंडळाच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध जगराता गायक लखबिर सिंह लक्खा यांच्या भव्य जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. अनेक देवी देवतांची गाणे गाणाऱ्या व जगराता कार्यक्रम करणाऱ्या लखबिर सिंह लक्खा यांच्या भव्य जगराता कार्यक्रमाचे आयोज़न नवरात्रौत्सव निमित पांढरकवडा येथे २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान करण्यात आला आहे. पांढरकवडा येथील गोलु अशोक राय व मित्र परिवाराच्या वतीने हा जगराता कार्यक्रम नव मित्र दुर्गोत्सव मंडळाजवळ आयोजीत करण्यात आला आहे. प्रथमच पांढरकवडा शहरात संपर्ण देश-विदेशात देवीचे भजन, किर्तन व जगराता कार्यक्रमासांठी सुप्रसिध्द असलेल्या लखबिर सिंह लक्खा यांच्या भव्य जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने भाविक, भक्त या कार्यक्रमाची आतुरतेने प्रतिक्षा करीत आहे. नवरात्रौत्सवाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी या जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने आयोजकांच्या वतीने आत्तापासुनच त्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. या जगराता कार्यक्रमाचा सर्व भाविक, भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन गोलु राय मित्रपरिवार व नवमित्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.