किशोर साहू, मौदा ,ता. १३ :- मौदा तालुक्यातील कोदामेंढी येथे श्री गजानन महाराज भजन व पारायण मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन दिवसीय कार्यक्रमात अभिषेक, घटस्थापना, आरती, साखळी पारायण ,भजन , महाआरती व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याची गावातील चारही वार्डातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी भक्त सहभागी झाले होते. याप्रसंगी जय गजानन ,श्री गजानन च्या गजरात अवघी कोदामेंढी नगरी दुमदुमली होती.


याप्रसंगी भाजपचे नेते विष्णू देशमुख, भगवान बावनकुळे ,नरेश बावनकुळे, निलेश बावनकुळे, उपसरपंच गोपाल गिरमेकर, ग्रामपंचायत सदस्य विष्णू बावनकुळे, खुशाल शिवणकर, रूपाली ठाकरे, पंकज खडसे,माजी सरपंच उमाकांत देवतळे, साईबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष शिवराम बावनकुळे ,संचालक सुभाष बावनकुळे, माऊली ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक प्रल्हाद किंमतकर , रेड्डी कॉन्व्हेंट चे संचालक व्यंकटेश रेड्डी , काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सिराज सय्यद सह गावातील, परिसरातील ,तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन भजन व पारायण मंडळाचे पदाधिकारी मगनलाल बावनकुळे, सतीश फटिंग ,भैय्या बावनकुळे, बबन ढोमणे, श्याम देवतळे, कवडू बारई, भोजराज मोहनकर, केदार वाघमारे, निखिल काचुरे, राजू मोटधरे, भगवान मसराम, चिंतामण ढोमणे,गजानन मोहूर्ले, नरेश हटवार,संजय घडुले, रेखा बावनकुळे, प्रतिभा बावनकुळे, सरस्वती गिरमेकर, जयश्री बावनकुळे सह समस्त भक्तगणांनी परिश्रम घेतले व समस्त ग्रामवासीयांनी सहकार्य केले.








