spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जवाहरनगर पोलिसांचा अमली पदार्थ सेवनाविरोधात मोठा प्रहार; शहापूर बाजारात गांजा ओढणाऱ्या दोन तरुणांना बेड्या

हंसराज, भंडारा :- जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. शहापूर बाजार परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्यावर एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत कडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसाय आणि व्यसन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पथक शहापूर परिसरात गस्तीवर असताना त्यांना काही तरुण सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या सिगारेटमधून गांजाचे सेवन करताना आढळले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या आरोपींची नावे दीपक इस्तारी नान्हे (वय ३० वर्षे) आणि भावेश विनोद टांगले (वय १८ वर्षे), दोन्ही राहणार नेहरू वार्ड, शहापूर, ता. जि. भंडारा अशी आहेत.

या कारवाईदरम्यान पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून गांजा ओढण्यासाठी वापरली जाणारी एक चिलीम, माचीसची डबी आणि एक सुती कापडी तुकडा असे साहित्य मिळून आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले असून, आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे ब्लड सॅम्पल देखील घेण्यात आले आहेत. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६८/२०२६ नुसार कलम २७ एन.डी.पी.एस. (NDPS) अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन साहेब, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक चुटे , पोलीस शिपाई नारनवरे , पोलिस शिपाई भालाधरे, या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. समाजातील अमली पदार्थांचे जाळे नष्ट करण्यासाठी अशीच कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.