Home Latest News पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करणार – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करणार – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे&period; महाबळेश्वर-तापोळा&comma; कोयनानगर-नेहरूनगर या दोन &&num;8216&semi;जॉय मिनी ट्रेन&&num;8217&semi; सुरू करण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>मेघदूत शासकीय निवासस्थान येथे &&num;8216&semi;जॉय मिनी ट्रेन&&num;8217&semi; सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते&period; यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ&period;अतुल पाटणे&comma; पर्यटन संचालक डॉ&period;बी&period;एन&period;पाटील&comma; महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की&comma; देशात महत्वाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि पर्यटन स्थळांचे कमी वेळेत भ्रमण करून देणाऱ्या &&num;8216&semi;जॉय मिनी ट्रेन&&num;8217&semi; हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे&period; हा उपक्रम राज्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळावर सुरू करण्यात यावा&period; राज्यात माथेरानच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू करण्यासाठी सर्व स्थानिक विविध परवाने घेणे&comma; सर्व तांत्रिक बाबी तसेच या उपक्रमातून आर्थिक नफा तपासून या उपक्रमाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा&period; कमी खर्चात अत्यंत आकर्षक पद्धतीने हा उपक्रम कसा सुरू करता येईल याची विभागाने खात्री करून घ्यावी&comma; असे निर्देश मंत्री देसाई यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version