spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महापौरांच्या पुढाकाराने असंघटित कामगारांना न्याय, कामगारांनी उपोषण घेतले मागे

चंद्रपूर :- शहर महानगरपालिकेत काम करणाऱ्या असंघटित कामगारांना महापौर संगीता खांडेकर यांच्या सकारात्मक धोरणांमुळे न्याय मिळाला आहे. कामगारांच्या सर्व मागण्या मनपा प्रशासनाने मान्य केल्याने कामगारांनी मंगळवारी दि 05 मे, 2026 रोजी उपोषण मागे घेतले. आता पुढील सात दिवसात कामगारांना टप्याटप्यात पगार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी एक तातडीची बैठक मंगळवारी घेण्यात आली, त्यात कामगारांच्या सर्व रास्त मागण्या मान्य करण्यात आल्या. यावेळी महानगरपालिकेचे महापौर संगिता राजेंद्र खांडेकर, आयुक्त अकुनूरी नरेश, उपायुक्त संदिप चिद्रावार, स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉ, अमोल शेळके, कामगार प्रतिनिधी व्दारे रतन यागकवाडा, अविनाश कोतपल्लीवार व कंत्राटी कर्मचारी उपस्थिती होती.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दि 4 मे, 2026 पासुन संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेने मनपा मुख्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलन सुरू केले. याची तात्काळ दखल घेत महापौर सौ. संगिता राजेंद्र खांडेकर यांनी मनपा आयुक्त, अधिकारी, कंत्राटदार व कामगार प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित केली यात कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. कामगारांनी केलेल्या मागणी नुसार आता त्यांना ऑक्टोबर 2025 पासूनचा पगार पुढील 7 दिवसात येणार आहे. तसेच प्रत्येक महिण्याला 10 तारखेच्या आत पगार दिला जाणार आहे. कामगारांना शासन निर्णयानुसार वाढीव भत्ता दिला जाणार आहे. जानेवारी 2026 पासूनच्या प्रलंबित वेतन पावत्या 2 दिवसात दिल्या जाणार आहे. समूह विमा नियमित काढण्यात येणार आहे. अशी माहिती महापौर सौ. संगिता राजेंद्र खांडेकर यांनी दिली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.