spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज आमंत्रित

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची / दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ” राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

सदर योजनेकरीता लाभार्थ्याचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे , ( वयाच्या पुराव्यासाठी टी.सी. / जन्म प्रमाणपत्र ), लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त 2.50 लाख किंवा पिवळे/केशरी रेशन कार्ड असावे, शारीरिकद्दृष्टया निरोगी आणि मानसिकद्दृष्टया निरोगी व प्रवासासाठी सक्षम असल्याचे आणि संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, ( अधिवास प्रमाणपत्र नसल्यास 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म दाखला ग्राह्य धरण्यात येईल.) योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी बाबी असलेले ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. सन 2026-27 या कालावधीसाठी महाबोधी मंदिर, बोधगया, बिहार या तीर्थस्थळाच्या यात्रेसाठी दि. 10 मे 2026 पर्यत (पुर्ण पत्तासह, मो. क्रमांक, वय) अर्ज सादर करण्यात यावे. सदर यात्रा 25 मे 2026 च्या दरम्यान चंद्रपूर रेल्वे स्थानकापासुन यात्रेकरीता रेल्वे निघनार आहे.

सदर योजनेच्या परिपुर्ण माहितीसाठी कार्यालय, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी. ऑफिस रोड गडचिरोली या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.