spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

नागपूर :- “राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय “उष्माघात प्रतिबंध कृती आराखडा” कार्यशाळेत नागपूर महानगरपालिकेचा हिट अक्शन प्लान 2026–27 हा “उत्कृष्ट कृती” म्हणून सादर करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी प्रभावीपणे सादरीकरण केले. ही कार्यशाळा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, हवामान बदल व मानवी आरोग्य राष्ट्रीय कार्यक्रम आणि वर्ल्ड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. सादरीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या एमएसयू चमूने घेतलेल्या परिश्रमांचे आयोजकांकडून कौतुक करण्यात आले.

यावेळी हंड्स ओन (Hands-On) उपक्रमांतर्गत एमएसयुचे सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. मिथुन खेरडे व प्रशासकीय अधिकारी डॉ. सोनल संघी यांनी “उष्माघात प्रतिबंधासाठी जोखीम संवाद आणि समुदाय सहभाग” या विषयावर नियोजन आराखड्याचे मुद्देसूद सादरीकरण केले. या यशामुळे नागपूर महानगरपालिकेच्या उष्माघात प्रतिबंधात्मक उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, इतर शहरांसाठी ही हे एक आदर्श उदाहरण ठरत आहे.

कार्यशाळेत एनसीडीसी, वर्ड बँक, पीएटीचकडून प्रा. डॉ. रंजन दास, संचालक, एनसीडीसी, गुरू राजेश जम्मी, हेल्थ स्पेशालिस्ट, वर्ल्ड बँक, डॉ.हिमांशू चौहान, अतिरिक्त संचालक व एनपीओ, आयडीएसपी एनसीडीसी, डॉ. शुभांगी कुलसंगे, संयुक्त संचालक, आयडीएसपी एनसीडीसी, डॉ. सौरभ गोयल, संयुक्त संचालक, आयडीएसपी एनसीडीसी, डॉ. आकाश श्रीवास्तव, अतिरिक्त संचालक व एचओडी, एनपीसीसीएचएच, डॉ. दिलीप मावळंकर, माजी संचालक, आयआयपीएच गांधीनगर या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. देश भारतील २० एमएसयुचे प्रतिनिधी अधिकारी सदर कार्यशाळेत उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.