spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिलंबम व थायबॉक्सींग स्पर्धेत परमात्मा एक कलापथक कांद्री खेळाडु उत्कृष्ट

– सुवर्ण१५, रौप्य १४ व कांस्य ०४ असे ३३ पदक पटकाविले; कांद्री-कन्हान शहरात जल्लोष

कन्हान :- रामटेक येथे आयोजित दोन दिवसीय सिलंबम व थायबॉक्सींग स्पर्धेत परमात्मा एक कलापथक मर्दानी आखाडा कांद्री येथील खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करित तब्बल ३३ पदके पटकावित दुस-या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करित उल्लेखनीय यश संपादन केल्यान संपुर्ण कांद्री-कन्हान शहरात विजयी खेळाडुंचे जल्लोषात स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

छत्रपती बहुउद्देशीय संस्था रामटेक, आमदार क्रीडा महोत्सव समिती तसेच शिवसेना मित्र परिवार व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथील गांधी चौकात दोन दिवसीय सिलंबम व थायबॉक्सींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून उत्साहात सुरूवात करण्यात आली. या स्पर्धेत परमात्मा एक कलापथक मर्दानी आखाडा कांद्री- कन्हानच्या खेळाडुंनी प्रशिक्षक इंद्रपाल वंजारी, दुर्गेश कोमटी, भुषण तिरोडे, ऋतुजा वंजारी आदीच्या मार्गदर्शनात स्पर्धेत सहभाग घेतला. कांद्री-कन्हान येथिल खेळाडुंनी शिवकाळीन कला, कौश ल्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून स्टिक फाईट मध्ये सुवर्ण पदक – १) ऋतुजा वंजारी २) रुदल वांढरे , ३) आर्यन नागपुरे , ४) जय कापसे, ५) अर्णवी भोयर,६) मोनाली खंडाते, ७) देविका भावरका, रौप्य पदक – १) प्रेम वंजारी, २) यश वरले, ३ क्रितेश वंजारी, ४) वेधांश कुंभलकर, ५) प्रकृती भोयर, ६) प्रियाशी खंडाते,७) कनक वाडीभस्मे, ८) श्रीमय सरोदे, कांस्य पदक- १) अथर्व चांदेकर, २) विहान वानखेडे. मीडल स्टिक – सुवर्ण पदक – १) ऋतुजा वंजारी, २) प्रेम वंजारी, ३) रुदल वांढरे, ४) कनक वाडी भस्मे, ५) प्रकृती भोयर, ६) श्रीमय सरोदे, रौप्य पदक-१) विहान वानखेडे, २) मोनाली खंडाते, ३) प्रियाशी खंडाते, ४) देविका भावरका, कांस्य पदक – १) यश वरले, २) वेधांश कुंभलकर, थाई बॉक्सिंग सुवर्ण पदक – १) प्रेम वंजारी, २) समक्ष मल्लेवार, रौप्य पदक – १) ऋतुजा वंजारी, २) कनक वाडीभस्मे असे १५ सुवर्ण, १४ रौप्य आणि ०४ कांस्य पदक अशी एकुण ३३ पदके पटकावित दुस-या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. स्पर्धेतील विजे त्या खेळाडुंना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्या त आले. या स्पर्धेत भरघोस यश संपादन करून कांद्री-कन्हान परिसराचे नाव लौकिक केल्याने खेळाडुंचे कांद्री-कन्हान शहरात आगमन होताच स्थानिक नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई वाटुन आणि गुलाल उधळुन जल्लोषात स्वागत करित अभिनंदन केले . परमात्मा एक कलापथक मर्दानी आखाडा कांद्री-कन्हानच्या यशस्वी कामगिरीमुळे युवकांमध्ये क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असुन खेळाडुंनी कांद्री-कन्हान शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .

Popular Articles