spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठीच्या कराटेपटूंची जिल्ह्यात दमदार बाजी !

– नागपूर जिल्हा कराटे स्पर्धेत प्रथम स्थान; आठ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

कामठी :- जिद्द, शिस्त आणि अथक सरावाच्या जोरावर बू-शिन शोटोकान कराटे असोसिएशन, कामठीच्या यश नागदेवे, विराज शर्मा, कृतिका श्रीवास, सार्थक रामटेके, श्रेयश बाले, अनुष्क करडे, तन्मय कुर्वे आणि आराध्या सहानी या आठ कराटेपटूंनी नागपूर जिल्हा कराटे स्पर्धेत प्रथम स्थान मिळवत कामठीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या दैदिप्यमान कामगिरीमुळे आठही खेळाडूंची नागपूर विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध गटांमध्ये कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. सातत्यपूर्ण सराव, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. या यशामुळे कामठीच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशासाठी खेळाडूंना मार्गदर्शक व प्रशिक्षक राजेंद्र रामटेके, अमन घोडेस्वार, गौरव तांडेकर आणि मनजीत घरडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि खेळाडूंची मेहनत यामुळे हे यश साकार झाले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी व सदस्य, पालक आणि परिसरातील नागरिकांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. आगामी नागपूर विभागीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करून कामठीचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या.

जिल्हास्तरावरील यशानंतर आता विभागीय स्पर्धेतही विजयी कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार या युवा कराटेपटूंनी केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.