किशोर साहू, मौदा :- शनिवार (ता.5 सप्टेंबर)ला शिक्षक दिनानिमित्त बोरी (घिवारी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून एक सुंदर अनुभव घेतला.
याप्रसंगी सरपंच विशाल सेलोकर, मुख्याध्यापक लोकेश प्रतेके,शाळा समिती उपाध्यक्ष कैलास झलके, अगंवाडी सेविका दामिनी तिजारे ,मदतनीस प्रतिमा मेश्राम ,आरोग्य सेविका निशा तायडे ,आरोग्य सहाय्यक वैद्य ,आशा सेविका रंजना चवळे ,शाळा मदतनीस अनिता मडावी ,पालक तेजराम पिंगरे ,अजय तिजारे उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच विशाल सेलोकर म्हणाले की,आजचा विद्यार्थीच उद्याचा शिक्षक, अधिकारी, नेता आणि देशाचा आधारस्तंभ आहे.
शिक्षक होणे म्हणजे केवळ वर्गात शिकवणे नाही, तर ज्ञान देणे, संस्कार घडवणे आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणे होय. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारताना घेतलेला हा अनुभव त्यांच्यातील आत्मविश्वास, जबाबदारी आणि नेतृत्वगुणांना नक्कीच बळ देईल. या सुंदर उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.





